Search This Blog

YCMOU B.A first year OPN 101 solved Assignments 2022

YCMOU B.A first year Solved Assignments 2022-OPN 101

YCMOU B.A first year OPN 101 solved Assignments 2022

वाचनासाठी प्रेरणादायी ठरणारे घटक स्पष्ट करा.

उत्तर:

वाचनासाठी अनेक घटक प्रेरणादायी ठरतात. वाचकाचा हेतू आणि त्यानुसार विविध प्रेरणादायी घटक कारणीभूत ठरत असतात. त्यातील काही मुख्य घटक खालीलप्रमाणे:

१. वय

बालवयात अक्षरओळख झाल्यावर दिसेल तो मजकूर वाचण्याची उत्स्फूर्तता असते. टीव्ही वरील जाहिराती , दुकानाचे नाव , किंवा इतर कुठलेही मजकूर! वाचनही आवड बालवयात उदयास येते.

२. वातावरण

जर अवतीभवती वाचन करणाऱ्या, शिक्षित व्यक्ती असल्या तर साहजिकच आपल्याला सुद्धा वाचावेसे वाटते.

पुस्तकांची उपलब्धता किंवा ग्रंथालयाची सोय स्वतःची आवडती पुस्तके, चर्चेत असलेली पुस्तके , इत्यादी गोष्टी वाचनाला प्रेरक ठरतात. अशा वातावरणातील व्यक्ती चांगली वाचक बनू शकते.

३. गरज:

माणूस गरजे शिवाय काहीही करू इच्छित नाही. व्यक्तीला वाचनाची निकड वाटली पाहिजे. तसेच अशी गरज सातत्याने भासली पाहिजे.

बरेचदा गरज संपली वाचनही संपते. वाचनासाठी गरज नसावी कारण वाचन हे चिरकाल टिकणारे असले पाहिजे. त्यातून आनंद मिळतो.

४. उपयुक्तता:

वाचकाला वाचनाची उपयुक्तता जर सतत वाटली तर तो वाचत राहील. विविध सरकारी दस्तऐवज वाचता आली पाहिजे त्यासाठी त्यांचे वाचन केले पाहिजे आणि त्यातील माहिती समजून घेतली पाहिजे.

ह्यामुळे अज्ञानामुळे येणारी अडथळे सोडवता येतात. नियमित व्यवसायामुळे असलेली पुस्तके वाचल्याचा फायदा होतो आणि उत्पन्नही वाढते.

५. सुकरता:

व्यवहार जलद होण्यासाठी वाचन आवश्यक असते. जाहिरात, हस्तपत्रिका, निवेदन, सूचना कळविल्या जातात.

त्या वाचल्यावर खरेदी विक्री, क्रिया प्रतिक्रिया चटकन इल्या जाऊ शकतात त्यामुळे व्यवहारातील खोळंबा टाळता येतो.

६. विश्वसनीयता:

ऐकलेल्या माहितीपेक्षा स्वतः वाचलेला मजकूर आपल्याला अधिक विश्वसनीय असतो.

वाचन न केल्यास सांगणाऱ्या व्यक्तीच्या बोलण्यात असलेल्या चुका खऱ्या समजून आपले नुकसान होऊ शकते त्यामुळे वाचन टाळू नये तर स्वतः वाचावे.

७. स्वभाव:

संवेदशील, भावुक, बौद्धिक कामे करणाऱ्या व्यक्तींना वाचनाचा छंद असतो. त्यांना जे काही वाचायला आवडते ते अशी लोक नेहमी सातत्याने वाचन करत असतात त्यामुळे त्यांना आनंद मिळतो.

८. वाचनाधारित व्यवसाय किंवा छंद:

शिक्षक, लेखक, विद्यार्थी, संशोधक इत्यादींना वाचन करावेच लागत असते. त्यांच्या वाचन कौशल्यावरच यश आणि अपयश अवलंबून असते. लहान मूल कॉमिक्स वाचण्याचा छंद जोपासतात.

९. शिक्षण:

ज्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट आणि ध्येय सतत शिकणे हेच आहे अशा विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना, संशोधकांना, लेखकांना वाचावेच लागते.

अभ्यासकांसाठी शिक्षण हि अखंड चालणारी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया असल्यामुळे प्रवाही असते. तिचे प्रवाहित्व सतत वाचले तारात राहील. आज शिक्षण फक्त पदवीपुरतेच राहिलेले नाही.

प्रत्येक व्यवसाय नोकरी कालानुरूप सतत बदलून घ्यावी लागतेत्यात सतत होणाऱ्या बदलांशी एकरूप होण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील ज्ञान वाचनातून आत्मसात करावेच लागते.

१०. स्पर्धा:

चांगली स्पर्धा हि सतत वाचन करत राहण्यास मदत करते. सकस अद्ययावत गुणवत्तापूर्ण, उत्कृष्ट व लवकरात लवकर प्राप्त करून द्यावयाच्या उद्दिष्ठांसाठी वाचन उपयुक्त ठरते.

आज निवृत्ती झाली तरीही स्पर्धा संपत नाही म्हणून अँटिक काळापर्यंत स्पर्धेत उतरण्यासाठी वाचन करावेच लागते.

११. आनंद:

वाचनातून मिळणार आनंद हा निर्मळ, उपयुक्ततेपलीकडचा, परमानंद सहोदर असतो. प्रत्येक व्यक्तीला शांती, आनंद, समाधान वाचनातून मिळते म्हणून वाचन गरजेच्या पलीकडे आहे.

१२. जिज्ञासा किंवा कुतूहल:

केवळ कुतूहलापोटी, शंकानिसरणासाठी आपण काही गोष्टींचे वाचन करतो. वाचनामागे ह्या प्रेरणा असतात.

प्रत्येक व्यक्तीच्या मनात काही व्यक्ती, वस्तू, ठिकाण, घटना इत्यादी बद्दल जाणून ज्ञानाची उत्सुकता असते ती वाचनाने पूर्ण करता येते. वाचन जिज्ञासा निर्माणसुद्धा करते ती जिज्ञासा पूर्ण सुद्धा करते.

श्रवण कौशल्य सुधारण्याचे उपाय सविस्तर नमूद करा.

स्वतःची कोणती श्रवण कौशल्ये कमी प्रतीची राहिली आहेत हे लक्षात आल्यावर कमकुवत कौशल्ये प्रभावी बनविणे गरजेचे असते. त्यासाठी आपण काही उपाय अवलंबू शकतो.

अ . अवधान केंद्रित करणे

यांत्रिकीकरणाचा अपरिहार्य परिणाम म्हणजे सभोवतालच्या वातावरणातील शांतता नष्ट करणारे आवाज. यातून हव्या त्या ध्वनीकडे सातत्याने अवधान केंद्रित करता येणे परिणामकारक श्रावण साधण्यात पहिले कौशल्य ठरते.

आ. प्रकटीकरणाच्या शैलीपेक्षा विषयाकडे लक्ष्य देणे

वक्ता फार भरभर आणि सावकाश बोलत असेल तर त्याच्या बोलण्याशी जुळेल असा श्रवणवेग घेणे हा एक उपाय आहे.

दुसरा उपाय म्हणजे, योग्य संधी मिळताच वाक्याला बोलून झालेल्या मजकुराचा सारांश विचाराने. सारांशाच्या आधारे वक्त्याच्या भाषणाचे सुविहित संकलन तुम्ही करू शकता.

इ . नावडत्या विषयातही रस घ्यायला शिकणे.

काही प्रसंगी विषय नावडता असूनही त्यासंबंधी श्रवण करावे लागते. अभ्यासाच्या नेमलेल्या विषयात असे नावडते विषय असतात.

अश्या विषयांवरील मार्गदर्शनपर व्याख्याने विद्यार्थी या नात्याने श्रावण करणे बंधनकारक असते.

नावडत्या विषयासंबंधीचे ज्ञान मिळविणे कशाप्रकारे फायदेशीर ठरू शकेल याचा विचार त्या विषयासंबंधीचे मत अनुकूल होण्यासाठी उपयोगी पडू शकेल.

ई . वाक्याचे मूल्यमापन न करता विषयाचे मूल्यमापन करणे.

वक्त्याचे दिसणे, शारीरिक हालचाली, पेहराव, लकबी, यांनी स्वतःचे अवधान विचलित होऊ न देता श्रवण करता आले पाहिजे.

विशेषतः शारीरिक व्यंग असणाऱ्या व्यक्तीचे बोलणे श्रवण करतांनाट्य व्यक्तींना त्यांच्या व्यंगाची जाणीव होऊ न देणे महत्वाचे आहे नाहीतर त्यांच्याकडून योग्य ती माहिती मिळविणे कठीण आहे.

उ. भावनांच्या आहारी न जाता श्रवण करणे

वक्त्यांच्या विचारांना शब्दांनी फैलावर घेण्याचा विचार अजिबात न करता त्याचे विचार अवधानपूर्वक श्रवण केले पाहिजे नाहीतर शेवट भांडणात व परस्पर शत्रुत्वात होतो.

श्रवण न करता वादविवाद करणे हि पद्धत चुकीची आहे. टीकाकारांशी शांतपणे बोलावे. टीकेच्या बाबतीत जी गोष्ट तुम्हाला खरी वाटते तिचा स्वीकार केल्यास रंगाचा पार खाली येतो.

ऊ. टिपण करण्यासाठी योग्य पद्धत वापरणे

वाक्याचे बोलणे मुद्देसूद असेल तर टिपं करणे खूप सोपे असते. अश्या बोलण्यात अगदी सुरुवातीला घोषणांच्या मध्यावर व शेवटी वक्ता महत्वाचे विचार सांगतो.

एक विचारासाठी एकच महत्वाचा असा विचार निवडावा कि जो वाचताच वक्त्याच्या विचारातील मुद्दे किंवा स्पष्टीकरणे चट्कन आठवतील.

ए . सर्व शक्ती एकवटून श्रवण करणे

श्रवण करताना केवळ शारीरिक हालचाली योग्य प्रकारे प्रदर्शित करून भागत नाही. शारीरिक हालचालींबरोबरच भावनिक व मानसिक प्रक्रिया चालू ठेवल्या तरच वक्त्याला तुम्ही योग्य प्रतिसाद द्याल.

असे योग्य प्रतिसाद दिले जेल तर वक्त्याचे बोलणेही उत्तम प्रतीचे होईल. प्रतिसादातून वक्त्याला प्रोत्साहन देण्यासाठी श्रवणात तुमचा सहभाग आवश्यक त्या सर्व इंद्रियांसह होऊ देणे हे तुमच्याच हातात आहे.

परिणामकारक बोलण्याचे घटक स्पष्ट करा

श्रोत्यांसमोर उभे राहण्याचा आपला हेतू त्या लोकांपर्यंत आपले विचार पोहोचवणे हा असतो.

त्यामुळे जेव्हा श्रोत्यांच्या मनाची तारायंत्रे आपल्या मनाच्या तारायंत्राशी नेमकी एकस्वरूपी व चर्चात्मक बोलणी करीत आपल्याबरोबर धावतील तेव्हा आपले बोलणे परिणामकारक ठरेल.

असे परिणामकारक बोलणे कोणत्या घटकांमुळे चालते त्याचा विचार करू:

१. अचूकता:

आपण जी माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचवू इच्छितो, ती किती अचूक आहे ते आधी तपासून घेतले असले पाहिजे.

तसेच माहिती सादर केल्यानंतर श्रोत्यांसमोर सादर केलेले निष्कर्ष वा युक्तिवादही अचूक असले पाहिजेत.

या दृष्टीने त्या विषयावर बोलायचे आहे त्या विषयासंदर्भात टिपणे काढताना टिपणांचे संदर्भ लिहून ठेवणे जरुरी आहे.

टिपणांच्या संदर्भामध्ये मासिकाचे किंवा पुस्तकाचे नाव, लेखक, किंवा संस्था यापैकी ज्यांनी ती माहिती दिली आहे त्यांचे नाव कोणत्या वर्षी किंवा किती वर्षासाठी ती माहिती दिली गेली आहे व पुस्तक किती मासिक जेथून उपलब्ध झाले आहे ते स्थळ या गोष्टींची नोंद ठेवणे जरुरी आहे.

आपल्या स्वतःच्या जरी एखाद्या विषयाबाबतच्या अनुकूल व प्रतिकूल विचारांचे प्रतिपादन अधिक आवडत असले तरीही लप्रतिकूल विचारांचाही परामर्श व्याख्यानातून किंवा बोलण्यातून स्पष्ट झाला पाहिजे.

अनुकूल व प्रतिकूल बाजू ध्यानात घेऊन आपले विचा अचूक असल्याबद्दल खात्री वाटते.

कोणीतरी एक वाजू घेऊन वक्ता बोलू लागला कि श्रोते वक्त्याच्या हेतूबद्दल साशंक होऊ लागतात. त्यांची वक्त्याविषयीची आपुलकी नाहीशी होते.

२. औचित्य:

भाषा हे विचार वाहून नेण्याचे माध्यम असल्याने ज्या श्रोत्यांसमोर आपण ती बोलणार त्यांना समाजाने जरूरीचे आहे.

भारतात असेही प्रांत आहेत कि जिथे भाषेच्या वापरात भिन्नता आढळते. त्यामुळे तुम्हाला अगदी परिचयाचे असलेले शब्द तुम्ही वेगळ्या प्रांतात वापरले तर ते श्रोत्यांना पूर्णपणे अपरिचितही असतील.

कोकणी भाषेतील किंवा विदर्भातील भाषेतील कित्येक शब्द मुंबईकरांना ठाऊकही नसतील त्यामुळे विचार प्रगत करणारी भाषा योग्य असणे महत्याचे आहे.

विषयाच्या अनुषंगाने काही शब्द श्रोत्यांना अपरिचित असले तरी त्यांचा वापर अपरिहार्य ठरते.

उदाहरणार्थ, तुमच्या गावात एखाद्या कारखाना बांधला जात असेल त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणसमस्येविषयी लोकांत जागृती निर्माण करण्यासाठी तुमचे व्याख्यान आयोजित केले गेले आहे.

अश्या याख्यानात कठीण किंवा तांत्रिक शब्द वापरावे लागतील. या शब्दांचा अर्थ सोप्या भाषेत श्रोत्यांना आधी स्पष्ट केला पाहिजे तरच, त्यांचा वापर करणे उचित ठरेल.

३. आटोपशीरपणा:

स्वतःचे जे विचार आपण मांडतो त्यात फापटपसारा नसावा. जे काही सांगायचे ते योग्य शब्दांत व थोडक्यात श्रोत्यांसमोर मांडणे जरुरीचे आहे .

आटोपशीरपणामुळे श्रोत्यांचे वक्त्याच्या म्हणण्याकडे लक्ष्य सातत्याने खेचलेले राहते. निःसत्व बोलणयातून सत्त्वयुक्त बोलणे निवडायला श्रोत्याला श्रम पडू नये त्यामुळे श्रोता लवकर थकतो व वक्त्याकडे दुर्लक्ष करू लागतो यासंदर्भात श्रोत्यांचे अवधान किती असते याची जाणीव वक्त्याने ठेवली पाहिजे.

श्रोत्यांना तुम्ही जे सांगाल त्यापैकी साधारणपणे २०%च स्मरणात राहणार आहे त्यामुळे व्याख्यानात पुष्कळ मुद्दे घेऊन फारसे स्मरणात राहणार नाही.

प्रत्यक्ष भाषण करतांना आपल्या बोलण्यात कोणता अनावश्यक भाग येतो हे ठरविण्यासाठी आपले भाषण शक्य असल्यास ध्वनिमुद्रण करून ऐकावे.

ते नसेल तर सहकारी मित्र यांच्यासमोर भाषण करून त्यांना पुढील गोष्टींची नोंद ठेवण्यास सांगावे.

४. सुस्पष्ट आणि नैसर्गिक अभिव्यक्ती:

आपले विचार श्रोत्यांपर्यंत पोहोचवन्यासाठी त्यांची अभिव्यक्ती आणि प्रत्यक्ष आवाजाद्वारे होणारे प्रक्षेपण नैसर्गिक व स्वच्छ असले पाहिजे.

ज्या शब्दांतून आपण विचार प्रगत करतो त्यांचा उच्चार स्वच्छ असला तर तो शब्द श्रोत्यांना कळायला त्रास होत नाही.

बर्याचला वक्ते सुरुवातीची दोन - तीन वाक्य मोठ्याने उच्चरतात, या वाक्यांच्या आधारे श्रोते आपली श्रवणेंद्रिये अनुकूल करून भाषण तयारीत ठेवतात .

परंतु वक्ता पुढची वक्रया एकदम हळू बोलू लागतात. तर श्रोते अस्पष्ट ऐकू लागतात. पुढचे बोलणे कानांना फार कष्ट देऊन ऐकू येत असेल तर श्रोत्यांना आव्हानांवर विपरीत परिणाम होतो.

स्पष्ट उच्चर म्हणजे उगाचच घास ताणून मोठ्याने ओरडणेही नव्हे. अशा प्रकारच्या स्वरांना कानांनी त्रास वाटत असेल तरीदेखील श्रोते कंटाळतील.

बरेचदा शब्दांतील शेवटचे स्वर नीट न उच्चरले गेल्याने नीट ऐकू येत नाही. यासाठी काही शब्द किंवा वाक्य मोठ्याने बोलण्याची सवय केली पाहिजे.

तोंडातून स्पष्ट शब्द काढता येण्यासाठी व्यंजनांचा उच्चार स्पष्ट करता आला पाहिजे.

स्पष्टता व्यंजनांमुळे येते तर जोर स्वरांमुळे येतो हे लक्षात ठेऊन बोलण्यात दोन्ही तत्वे वापरावीत. हलक्या स्वरात पूर्ण शब्दोत्तराने बोलणारे वक्ते चांगले ठरतात कारण दूर अंतरावरच्या श्रोत्यांपर्यंतही आहे बोलणे व्यवस्थित पोहोचते.

५. विपुल शब्दसंग्रह:

ज्याचे भाषण अस्खलित व सलगपणे चालतो, आशयाच्या तोंडून एका मिनटात सव्वाशे शब्द उच्चारले जातात.

आपले विचार सुंदर व प्रभावी भाषेतून श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याच्यासाठी शब्दसंग्रह विपुल असणे उपयोगी ठरते.

निरीक्षणामध्ये ज्ञानेंद्रियांची भूमिका स्पष्ट करा.

ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने निरीक्षणामध्ये खूप मदत मिळते. कोणती ज्ञानेंद्रिये कशाप्रारे निरीक्षणात मदत करतात हे पुढीलप्रमाणे:

१. डोळा:

वस्तूच्या दृश्य बाजूंबद्दल माहिती मिळविणे हे डोळ्याचे कार्य. कोणत्याही वस्तूने परावर्तित केलेले प्रकाशकिरण डोळ्यांवर पडले कि, दृष्टीचे कार्य सुरु होते.

आपल्या रोजच्या भाषेत सांगायचे तर तांबडा ते जांभळा हे रंग आपण पाहू शकतो. ह्या मर्यादेच्या पलीकडे असलेले तारींग-लांबी मात्र आपण पाहू शकत नाही.

एखाद्या वस्तूवर पडलेला प्रकाश डोळ्यांत जातो तेव्हा त्या वस्तूची प्रतिमा नेत्रपटलांवर पडते. या प्रतिमेचा अर्थ मेंदूवर लावला जाते. डोळ्यांमुळे आपल्याला वास्तूचा आकार , रंग, हालचाल, खोली, अवकाश, यांची माहिती मिळते.

२. कान:

कानांमुळे ध्वनीचे(आवाजाचे) संवेदन होते. वास्तूच्या कंपनामुळे ध्वनी होतो, तर काहीवेळा हवेच्या स्तरांत कंपने निर्माण होऊन ध्वनी उत्पन्न होतो.

जेव्हा वास्तूचे कंपन थांबते तेव्हा त्याच्यापासून त्याच्यापासून आवाज निर्माण होणे बंद होते. म्हणून कंपन पावणाऱ्या सर्व वस्तूंमधून ध्वनी निर्माण होतो असे म्हणता येईल .

हा ध्वनी कर्णपटलांवर आदळतो आणि तो मेंदूपर्यंत पोहोचल्यावर आवाजाचे संवेदन होते. आवाजामुळे ती वस्तू किती दूर व किती जवळ आहे याचेही ज्ञान होते.

कणांमुळे विविध वस्तूंचे आवाज, व्यक्तींचे वोळणें, संगीत , प्राण्यांचे आवाज , निसर्गातील आवाज ऐकू येतात यांचा मोठा फायदा म्हणजे संवादासाठी होणार उपयोग विशिष्ट भाषा बोलून आणि ऐकूनच आपण संवाद करतो.

३. त्वचा:

त्वचेमुळे स्पर्श, दाब, थंडपणा , उबदारपणा यांची जाणीव होते. त्वचेची संवेदशीलता सर्वत्र सारखी नसते. स्पर्शज्ञान हे शरीराच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असते.

याचे तापमानावर फरक पडत नाही. त्वचेच्या पृष्ठभागावरील तापमान साधारणतः ३२ ते ३३ अंश सेल्सिअस असते.

४. जीभ:

जीभेमुळे चवीचे ज्ञान होते. चवीचे ४ प्राथमिक प्रकार आहेत ते म्हणजे - खरात आंबट , गोड आणि कडू . चव हि पूर्णतः स्वतंत्र नसते. तिचा वासाशी बराचसा संबंध असतो प्रत्येक चवीसाठी जिभेवर वेगळी चवग्रंथी असते.

चवीचा दृष्टीशीही काही प्रमाणात संबंध असतो . चांगल्या रंगाचा सजलेला अन्नपदार्थ असेल तर तो आपल्याला आवडण्यात याही गोष्टींचा काही प्रमाणात संबंध असतो .

५. नाक:

नाकामुळे वासाचे ज्ञान होते. यामुळे लांबूनच अन्नपदारथाचा दर्जा ओडखता येतो. वासामुळे एखादी वस्तू ओळखता येते.

वासामुळे अनेक भावभावनाही उत्पन्न होतात. कुजलेल्या पदार्थाच्या वासाची शिररी वाटते, परिंतु तर सुगंध येत असेल तर प्रसन्नता वाटते.

आकर्षणातसुद्धा वासाचा सहभाग असतो त्यामुळे विविध प्रकारची अत्तरे बाजारात उपलब्ध आहेत तारे पहिले तर वास आणि चव एकमेकांशी निगडित आहेत.

अन्नपदार्थ कसा असेल याचे अनुमान आपण सुरुवातीला वासावरून करतो. डोळे व कां इतक्या प्रमाणात घाणेंद्रियांचा विकास माणसाने केलेले नसला तरी सवयीने नाकाची कार्यक्षमता वाढवता येते.

31 comments:

  1. धन्यवाद.अजून काही प्रश्नांची उत्तरे पाहिजे आहेत

    ReplyDelete
  2. Abhyas prakrieshi nigdit ghatak thodakyat spasht kara.
    Hya questionch answer pahije.

    ReplyDelete
  3. इतर विषयांचे कधी अपलोड करणार? करणार की नाहीं.?

    ReplyDelete
  4. अभ्यास प्रक्रियेशी निगडित घटक?

    ReplyDelete
    Replies
    1. अभ्यास प्रक्रियेशी पिगडित घटक

      Delete
  5. 🙏 𝐓𝐡𝐚𝐧𝐤 𝐲𝐨𝐮.🙂

    ReplyDelete
  6. अभ्यास प्रक्रियेशी निगडीत घटक

    ReplyDelete
  7. अभ्यास प्रक्रियेशी निगडित घटक

    ReplyDelete
    Replies
    1. अ᭤यास ᮧᳰᮓयेशी िनगडीत घटक थोड
      ᭍यात ᭭प᳥ करा

      Delete
  8. Abhyas prakriyshi nigdit ghatak ans

    ReplyDelete
  9. Abhyas prakriyeshi nigadit ghatak spasht kara hyache ans have hote

    ReplyDelete