आशा मुंडले यांच्या निबंधातील लेखातील दिसणारी स्त्री याविषयी सविस्तर विवेचन करा.
उत्तर:
श्रीमती आशा मुंडले ह्या भाषाशिक्षिका आहेत. त्यांनी दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या भाषेविषयी निरीक्षणे व चिंतने ' भाषा आणि जीवन ' सारख्या पत्रिकेतून प्रसिद्ध केलेली आहेत.
भाषेच्या वापरातून व्यक्तीचं समाजातील स्थान किंवा दर्जा आपोआप व्यक्त होत असतो. श्रीमती आशा मुंडले ह्यांनी या भाषापर निरीक्षणांचा उपयोग करून समाजातील स्त्री - पुरुष समानतेचा खरपूस समाचार ह्या लक्षणातून घेतला आहे.
स्त्री - पुरुष समानतेच्या जरी आपण बढाया मारत असलो तरीही हा समाज पितृसत्ताक आहे आणि ह्यात स्त्रीला दुय्यम लेखले जाते हे त्रिवार सत्य आहे आणि हे लपविता येत नाही ये त्यांनी लय लेखातील स्त्रीच्या उदाहरणावातून स्पष्ट केलेले आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आपण एखाद्या स्त्रीसाठी किती खालच्या पातळीचे शब्दप्रयोग करतो हे त्या आक्रमकतेने निदर्शनास आणून देतात.
लेखिका सांगतात , कि भाषेला जरी कवींनी 'आई' म्हटले असले तरीही त्याच भाषेचा उपयोग दुसऱ्या स्त्रीला हिणविण्यासाठी केला जातो. लेखिका पुढे सांगतात कि त्यांनी इंग्रजीत एका बाईचे वर्णन 'सेक्सी बिच ' असं वाचलं होत. त्यावेळेस त्या सांगतात कि , मराठीत, रागात प्रत्युत्तर म्हणून 'काय रे! तुला आई बहीण आहेत कि नाही?' असे विचारतो पण त्यातही 'बायको' हा शब्द नसतोच म्हणजे लेखिका निदर्शनास आणून देतात कि, जरी आपण आई बहीण ह्यांच्याप्रमाणे दुसऱ्या स्त्रीला आदराची अपेक्षा करत असलो तरीही ती अपेक्षा आपण बायकोसाठी करत नाही.
Download Eng-214 Complete Assignments for free !! Click Here to Download
बायको हि पायातील चप्पल आहे, किंवा ती आपल्या गोठ्यातील जनावर आहे जी आपल्या ताब्यात असावी. अश्याप्रकारे संकुचित विचाराची धारणा ह्यामागे असावी असे वाटते.
ह्याचप्रमाणे, नवरा मेलेल्या विधवा स्त्रीला 'रांड ' 'छिनाल ' सारख्या अर्वाच्च शब्दात बोलून तिचा छळ करणारे नालायक , मंदबुद्धी लोक आपल्या समाजात आहेत. जी माणसं जन्माला येतात ती मारतातच पण, स्त्रीचा नवरा मेळा म्हणून तिचा नको ते शब्द वापरून छळ केला जातो
तिला अपशकुनी मानलं जातं . नव्याच्या मृत्यूची शिक्षा तिला आजन्म भोगावी लागते. नवर्याच्या मरणाने उध्वस्त झालेले जीवन पूर्णपणे नष्ट करण्यास समाज मागे-पुढे पाहत नाही.
तसेच मुलगा नसलेली स्त्री म्हणजे 'वांझ'! मुलगा नसलेल्या पुरुषाला 'वांझ पुरुष' नावाचा शब्दच सापडत नाही, म्हणजे केवढी हि स्त्रियांची हेटाळणी! भाषेला आई म्हणणाऱ्या मराठी भाषेतसुद्धा वांझ सारखे अनेक शब्द सापडतात. केवढा हा विरोधाभास आणि केवढी हि शोकांतिका.
स्त्रियांनीं लग्न करतांना कुमारिका असण्याची आत बिनधास्तपणे घातली जाते पण पुरुषांसाठी पुरुषांनी ठरवलेले श्रेष्ठत्व पुरेसे असते. स्त्री पुरुषांच्या मिलनातून जन्माला येणाऱ्या बळावर त्याच्या 'स्त्री किंवा पुरुष' असण्यावरून स्त्रीला मान आणि अपमान सहन करावा लागतो. पुत्रांची जन्मदाती स्त्री अधिक सन्माननीय तर मुलींना जन्म देणाऱ्या स्त्रीला दुय्यम नजरेने बघितले जाते.
ज्याप्रकारे पुरुष स्वतःच्या शरीराची तुलना जगातील सर्वात उच्च कोटीच्या वस्तूंशी करतात, तसे ते स्त्रियांसाठी नसते. उलट , हे स्त्रियांसाठी एक अभिशाप सिद्ध होते . स्त्रीच्या अवयवाची तुलना एखाद्या फळाच्या झाडाप्रमाणे 'छातीवरील फळ ' अशी केली जाती . एखाद्याने तिच्यावर झडप घातली , चोळमेळा केला, कुस्करले इत्यादी शब्दांद्वारे तिला एखाद्या सोप्या पद्धतीने हेरता येणाऱ्या शिकारीप्रमाणे दर्शविण्यात येते. आणि अश्याप्रकारे वर्णन करणारे पुरुषच असतात त्यामुळेच त्यांच्याबद्दल असले शब्द नाहीत. .
बायकांच्या शरीरावरुन त्यांची अक्कल त्यांच्या शरीराच्या गाडीवरून त्यांना विनोदातून हिणविल्या जाते. स्त्री म्हणजे एकदम हळवी , रडवी , दुबळी , अबोल , प्रकारची . जर ती कर्तबगार असली तर तिला 'पुरुषी ' बोलून तिच्या कर्तबगारीवर 'पुरुषी ' ठसा मारून तिला तिच्या स्त्रीपणाची हद्द लक्षात आणून दिली जाते . .
ज्याप्रकारे स्त्रीला तिच्या नवर्याच्या मरणानंतर छळले जाते तसे पुरुषांच्या बाबतीत दिसून येत नाही. ,एक गेली ( मेली) तर छप्पन मिळतील' ह्यासारखी नीच वाक्ये बोलताना कुठलेही दुःख जाणवत नाही.
'बायकांची अक्कल चुलीपुरती' 'बैलबुद्धी' माणूस 'बायकी' वृत्तीचा माणूस , घरकोंबडा , बायकोच्या तालावर नाचणारा माणूस हे तुच्छतेने शब्द एखाद्या स्त्रीला जोडीदार म्हणून साथ देणाऱ्या पुरुषासाठीची विशेषणे.
एखाद्या स्त्रीला एखाद्या वास्तूप्रमाणे 'माल ' वास्तुलाभ' 'कन्यादान' संबोधले जाते. भांडणातील सर्वात मोठे शस्त्र म्हणजे 'शिव्या' . कोण कोणाला आई वाहिनीवरून सर्वात वाईट शिव्या देतो ह्यावरून लोकांमध्ये जणू चढाओढच असते.
सहज बोलता बोलता आपण जेव्हा स्त्रीला कमी, तुछ , धोकादायक , मोहाकडे नेणारी , माल , वगैरे समजतो आणि तसे शब्दप्रयोग करतो तेव्हा प्रत्येक ताशा घटनेतून स्त्रीच माणूसपण , स्त्रीच समानपणाचा ऱ्हास होत असतो .
स्त्री हि पुरुषांप्रमाणेच एक मनुष्य आहे. तिला स्वतःच अस्तित्व आहे आणि ती कोणती वस्तू नाही तर तिला भावना आहेत ह्याचे भान ठेवले पाहिजे . मानुष्यजातीचे अस्तित्व हे पुरुष आणि स्त्री ह्यांच्यावर अवलंबून असे. स्त्रीविना हे जग, देश , समाजच नाही तर कुटुंबही शक्य नाहीच.
Can you please give us fyba all assignment answer.please reply
ReplyDelete