'पत्रामधून लेखकाचे व्यक्तिमत्व , स्वभाव , त्याची विचारपद्धती यांचे दर्शन होते' हे विधान सानेगुरुजीच्या सुंदर पात्रांमधील लेखावरून स्पष्ट करा.
उत्तर:
'पत्रामधून लेखकाचे व्यक्तिमत्व , स्वभाव, त्याची विचारपद्धती यांचे दर्शन होते' हे विधान सानेगुरुजींचा लिहिलेल्या सुंदर पात्रांमधील लेखावरून स्पष्ट होते.
पत्राच्या सुरुवातीला साने गुरुजींनी लिहिलेले पत्र मिळाल्याचे आणि ते वाचून आनंद झाल्याचे सांगतात तसेच हे सांगत असतांना काही लोकांची पत्रे किती वाईट अक्षरांत लिहिलेली असतात.
सही तर स्वतः ब्रह्मदेवाला सुद्धा उलगडणार नाही असा विनोद सानेगुरुजी करतात ह्यावरून सानेगुरुजी जरी काटकसरी असले तरी, त्यांच्यातला विनोदीपणा पत्र वाचणाऱ्याला स्मितहास्य करायला लावणारा नक्कीच असतो.
सानेगुरुजी छापखान्यात खिळे जुळविणाऱ्या कामगारांची व्यथा सांगताना खराब अक्षरांमुळे त्यांना किती कष्ट घ्यावे लागतात ह्याची जाणीव करून देतात.
जरी सानेगुरुजी विनोदी असले तरीही त्यांचे व्यक्तिमत्व हे कष्टकरी लोकांच्या व्यथा समजून घेणारे संवेदनशील असल्याचे जाणवते.
हे समजावून सांगताना साने गुरुजी मनुष्याचा आयुष्यात धर्माचे स्थान आणि त्यामागील तत्वज्ञान काय हे पटवून देतात.
खराब अक्षर लेखनामुळे अक्षर लावता लावता खूप कष्ट घ्यावे लागतात. जो मनुष्य दुसर्यांचा विचार करतो, स्वछ लिहितो त्याच्या आयुष्यात धर्म येऊ लागतो.
नंतर साने गुरुजी धर्माची खरी व्याख्या काय? ते आणि पारंपरिक व्याख्येशी वेगळी कशी? ह्याचे तत्वज्ञानाशी सांगड घालून विवेचन करतात ह्यावरून सानेगुरुजीची विचारपद्धती हि प्रगतिशील व पुरोगामी असल्याची दिसून येते.
सानेगुरुजी आपले विचार व्यक्त करतांना धर्म म्हणजे समुद्रात अंघोळ करणे , वडावर जाणे नसल्याचे सांगतात कारण ह्यात जरी धर्माच्या नावावर क्रियाकर्म केले जात असले तरीही ह्यात दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या भावना, सुखदुःख पाहणे हे नसते उलट सानेगुरुजी विनोदीपणे अमेरिकन लेखकाचे उदाहरण देत जुगार खेळणे धर्ममय असल्याचे गमतीने सांगतात कारण त्यात आपण आपल्या सवंगड्याचा विचार करत असतो.
महत्वाचे म्हणजे सानेगुरुजी विनोदातून चांगल्या विचारांना प्रोत्साहन देताना दिसतात. त्यातून त्यांचे सखोल विचार, विनोदी स्वभाव व पुरोगामी विचारसरणी सर्व स्पष्टपणे दिसून येते.
सानेगुरुजी पुढे सुधास लिहितांना शाळेतील वाचनाच्या कार्यक्रमात सुधाच्या गटाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करतात पण तसेच ते सुधाला जाणवत असणाऱ्या घुसमट पणाला सुद्धा जाणतात.
लेखकाला वाचकाच्या मनातील भावना जाणवत असतात असेच काही सानेगुरुजीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल दिसून येते. सुधाला वाचन कसे करायचे कि जुंमुळे वाचनाचा पुरेपूर आनंद कसा घेता येईल ह्याचे मार्गदर्शन सानेगुरुजी एकदम थोडक्यात पण सोप्या शब्दांत समजावून सांगतात.
वाचन हे लेखकाच्या भावना आणि विचाराप्रमाणे असले पाहिजे वाचताना लेखक ज्याप्रमाणे जाणवतो त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा त्या गोष्टी जाणवल्या पाहिजे तर आवाज गंभीर असला तर गंभीर, खेळकर असला तर खेळकर इत्यादी व्हायला हवा हे सर्व सांगताना एका लेखकासोबत एक मार्गदर्शक व्यक्तिमत्व आपल्याला जाणवते.
सानेगुरुजी जरी वाचनाचे पुरस्कर्ते असले तरीही ते खेळाचे महत्व जाणतात. खेळाची गम्मत हि महत्वाची आहे जरी नंबर मिळाला नाही तरीही! ह्यातून सानेगुरुजी खेळाडू वृत्तीला जिंकण्यापेक्षा अधिक महत्व देतात कारण खेळ हि वस्तू आहे असे ते मानतात.
पुढे ते आषाढ महिन्याच्या शेवटी येणारा भरपूर पाऊस आणि त्या पावसामुळे दुष्काळातील सुटकेमुळे मूळ्नार आनंद व्यक्त करतात ह्यावरून त्यांचे देशप्रेम व देशाप्रती असलेली कळवळ दिसून येते.
जरी आपण अन्न, वस्त्र ह्या बाबतीत परावलंबी असलो तरीही आपण स्वावलंबी झालो पाहिजे असा सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्या पत्रात दिसून येतो.
सानेगुरुजी शेतीला फक्त शेतीच नाही तर भेदाभेद नष्ट करण्याचे साधन म्हणून बघतात. ह्यावरून त्यांची वैचारिक प्रगल्भता जाणवते. माणसे जरी वेगवेगळी असली तरीही संकटाच्या वेळी कशी एक होतात हे सानेगुरुजी आपल्या दुष्काळातील निरीक्षणावरून सांगतात.
त्यांच्या प्रत्येक निरीक्षणाच्या मागे कुठे ना कुठे तत्वज्ञान असल्याचे आढळते. ढगातून बाहेर पडण्यासाठी धडपडणाऱ्या प्रकाशाप्रमाणे आपले मन अंधाराशी, निराशाशी झगडत असते पण प्रकाश हा अधून मधून बाहेर पडतच असतो ह्यातून वैचारिकपणा जाणवतो.
सानेगुरुजी आपल्या पात्रातून खूप काही शिकवण्याचा प्रयत्न करताना दिसतात सोबतच जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याला थोडी विनोदाची जोडी असा सुंदर लेख त्यांच्या विचारपद्धती, व्यक्तिमत्व आणि स्वभाव ह्याने पुरेपूर दिसून येतो.
Download Eng-214 Complete Assignments for free !! Click Here to Download
भाषेच्या वापरातून व्यक्तीचं समाजातील स्थान किंवा दर्जा आपोआप व्यक्त होत असतो. श्रीमती आशा मुंडले ह्यांनी या भाषापर निरीक्षणांचा उपयोग करून समाजातील स्त्री - पुरुष समानतेचा खरपूस समाचार ह्या लक्षणातून घेतला आहे.
स्त्री - पुरुष समानतेच्या जरी आपण बढाया मारत असलो तरीही हा समाज पितृसत्ताक आहे आणि ह्यात स्त्रीला दुय्यम लेखले जाते हे त्रिवार सत्य आहे आणि हे लपविता येत नाही ये त्यांनी लय लेखातील स्त्रीच्या उदाहरणावातून स्पष्ट केलेले आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आपण एखाद्या स्त्रीसाठी किती खालच्या पातळीचे शब्दप्रयोग करतो हे त्या आक्रमकतेने निदर्शनास आणून देतात.
लेखिका सांगतात , कि भाषेला जरी कवींनी 'आई' म्हटले असले तरीही त्याच भाषेचा उपयोग दुसऱ्या स्त्रीला हिणविण्यासाठी केला जातो. लेखिका पुढे सांगतात कि त्यांनी इंग्रजीत एका बाईचे वर्णन 'सेक्सी बिच ' असं वाचलं होत. त्यावेळेस त्या सांगतात कि , मराठीत, रागात प्रत्युत्तर म्हणून 'काय रे! तुला आई बहीण आहेत कि नाही?' असे विचारतो पण त्यातही 'बायको' हा शब्द नसतोच म्हणजे लेखिका निदर्शनास आणून देतात कि, जरी आपण आई बहीण ह्यांच्याप्रमाणे दुसऱ्या स्त्रीला आदराची अपेक्षा करत असलो तरीही ती अपेक्षा आपण बायकोसाठी करत नाही.
No comments:
Post a Comment