Search This Blog

स्वल्पविरामचिन्ह घालण्याचे नियम सोदाहरण स्पष्ट करा.

स्वल्पविरामचिन्ह घालण्याचे नियम सोदाहरण स्पष्ट करा.



स्वल्पविरामचिन्ह घालण्याचे नियम सोदाहरण स्पष्ट करा.

उत्तर:

०१. जे वाक्य सरळ आहेत त्यात विरामचिन्ह घालण्याची गरज नाही. मला अभ्यास करायला आवडते. ती पुस्तक वाचते. तू कोणते पुस्तक वाचतोस? किती मोठा हा संग्रह! हि वाक्ये सरळ आहेत ह्या वाक्यांचे विभाग नाहीत ह्या उदाहरणांत पहिल्या दोन वाक्यांत पूर्णविराम नंतरच्या वाक्यात प्रश्नचिन्ह व त्यानंतरच्या वाक्यात उद्गारचिन्ह पाहिजे.

०२. सरळ वाक्यांमध्ये जर दुसरे वाक्य किंवा वाक्यांश आले, तर त्या वाक्यांच्या किंवा वाक्यांशाच्या आरंभी व शेवटी स्वल्पविरामचिन्ह पाहिजे. एक मुलगा, इतर मुलांना सोबत घेऊन, झाडे लावू लागला. येथे, एक मुलगा झाडे लावू लागला हे वाक्य सरळ आहे त्यामध्ये संबंधाचे इतर मुलांना सोबत घेऊन हे दुसरे वाक्य आहे आहे; म्हणून वाक्यांच्या मागे आणि पुढे स्वल्पविराम पाहिजे

०३. जी दोन-तीन सरळ वाक्ये मिळून एक मोठे वाक्य होते त्या त्या त्या वाक्यांच्या मध्ये स्वल्पविराम पाहिजे . विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही आलात, झाडे लावलेत, आनंद झाला.

०४. एकाच प्रकारचे दोनपेक्षा अधिक शब्द आले त्या प्रत्येक शब्दापुढे स्वल्पविरामचिन्ह पाहिजे. उदाहरणार्थ, मानवाला जीवन जगण्यासाठी अन्न ,वस्त्र, निवारा आणि इंटरनेट गरजेचे आहे.

०५. कोणत्याही एका प्रकारच्या दोन शब्दांमध्ये उभयान्वयी अव्यय आले असता, त्या शब्दांच्या मध्ये स्वल्पविराम नको. उदाहरणार्थ, राम आणि श्याम दोघे भाऊ आहेत. येथे राम आणि शाम हे दोन एकाच प्रकारचे शब्द आले आहेत. ह्यांच्यामध्ये आणि हे उभयान्वयी अव्यय आले आहेत म्हणून ह्या दोन नामांच्या मध्ये स्वल्पविराम नको.

०६. वाक्याच्या आरंभी संबोधन असता, त्याच्या पुढे स्वल्पविराम चिन्ह पाहिजे; आणि ते मध्येच आले असता त्याच्या मागे व पुढे स्वल्पविराम पाहिजे. गुरुजी, मला माफ करा. येथे गुरुजी हे संबोधन आरंभी आहे म्हणून ह्याच्या पुढे स्वल्पविराम पाहिजे.

०७. असता शब्द असताना इत्यादी शब्द वाक्यात आले, तर त्याच्या पुढे कधी कधी स्वल्पविराम पाहिजे. मी घरी जात असता, रस्त्यात चावी हरवली.

०८. संबंधी सर्वनामे व ते ज्याचा ज्याचा संबंध दाखविते ते पुरुषवाचक किंवा दर्शक सर्वनाम, हि दोन सर्वनामे वाक्यांमध्ये आली व त्यांच्यामध्ये दुसरे शब्द आले आहेत तर, त्या पुरुषवाचक सर्वनामामागे, किंवा दर्शक सर्वनामामागे, स्वल्पविरामचिन्हं पाहिजे. जे पुस्तक तुम्ही विकत घेतले, ते मनोरंजक आहे.

०९. परंतु जर संबंधी सर्वनाम व पुरुषवाचक सर्वनाम ह्यांच्यामध्ये दुसरे शाब्द आले नाहीत, तर पुरुषवाचक सर्वनामामागे स्वल्पविरामचिन्ह नको.

१०. आणि, तर, परंतु, इत्यादी अव्यये वाक्यांगांच्या मध्ये आली असता त्या प्रत्येक अव्ययाच्या मागे स्वल्पविरामचिन्ह पाहिजे. जर पाऊस आला, तर कपडे भिजणार. मला पुस्तक हवे होते, पण आता नको.

११. की, हे अव्यय वाक्यांत आले असता, त्याच्या संबंधांप्रमाणे त्यांच्या मागे, किंवा पुढे, स्वल्पविरामचिन्ह पाहिजे. उदाहरणार्थ, तो म्हणाला कि, मी आज शाळेत येऊ शकत नाही.

१२. कोणाचे म्हणणे किंवा लेख वाक्यात घेतले असता त्या म्हणण्याच्या किंवा त्या लेखाच्या प्रारंभी स्वल्पविरामचिन्हं पाहिजे.

१३. एका मनुष्याची किंवा वस्तूची दोन नामे आली असता व त्यापैकी कोणत्याही नापास दुसरे शब्द जुळले असता, त्या प्रत्येक नामाच्या पुढे स्वल्पविराम पाहिजे.

१४. परंतु एकही नापास दुसरा शब्द जोडला नाही, तर स्वल्पविराम चिन्ह नको.


HEN 101
OPN 101
GKN 101
HUM 101

No comments:

Post a Comment